भिवंडी येथे ३ बोगस डॉक्‍टरांना अटक !

ठाणे, ५ जानेवारी (वार्ता.) – कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांना चिकित्‍सालये थाटून नागरिकांवर उपचार करणार्‍या ३ बोगस डॉक्‍टरांना पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मीनारायण इगा (वय ४६ वर्षे), नरेश बाळकृष्‍णा (वय ४९ वर्षे) आणि साहबलाल वर्मा (वय ५२ वर्षे) अशी त्‍यांची नावे आहेत. या तिघांचे शिक्षण जेमतेम इयत्ता १० ते १२ पर्यंतचे असून खासगी रुग्‍णालयांमध्‍ये ‘वॉर्डबॉय’ म्‍हणून काम केल्‍यानंतर त्‍यांनी परिसरात चिकित्‍सालये थाटली, असे प्राथमिक अन्‍वेषणातून समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्‍वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • जनतेच्‍या जिवाशी संबंधित असणार्‍या विभागात फसवेगिरी करणार्‍यांना कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचे भय नसणे संतापजनक !
  • वैद्यकीय क्षेत्रातील अशा फसव्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !