कोरोना महामारीच्या दृष्टीने भारतात पुढील ४० दिवस महत्त्वाचे !

नवी देहली – चीन, दक्षिण कोरिया आदी देशांना कोरोना महामारीचा फटका बसला आहे. या पाश्र्वभूमीवर कोरोनाची लाट भारतात येऊ नये, यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्नशील आहे. ‘कोरोनाचा महामारीच्या दृष्टीने भारतात पुढील ४० दिवस महत्त्वाचे आहेत’, असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.

पुढील जानेवारी मासात भारतात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. ‘भारतात कोरोनाची लाट आल्यास त्याची तीव्रता अल्प असेल, तसेच रुग्णालयात भरती होण्याचे आणि रुग्ण दगावण्याचे प्रमाणही अल्प असेल’, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.