मातीला स्पर्श करण्याचे महत्त्व

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘मातीमध्ये आपल्या आरोग्याचे गुपित लपलेले आहे’, असे सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात. ‘आपल्या शरिराचा भूमीशी येणारा संपर्क अनेक व्याधींपासून आपले रक्षण करू शकतो’, असा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे. सद्गुरु जग्गी वासुदेव म्हणतात, ‘‘ज्याप्रमाणे आपल्याला वायू आणि पाणी यांची आवश्यकता असते, त्याप्रमाणे मातीशी थेट संपर्क होणे, ही आपल्या शरिराची मूलभूत आवश्यकता आहे.’’ लागवडीमध्ये काम करतांना हाता-पायांच्या तळव्यांचा मातीशी सहज संपर्क येतो आणि मातीतील ऊर्जा शरिरामध्ये शोषली जाते. सध्या शारीरिक व्याधी, तसेच नैराश्य, निद्रानाश यांसारख्या मानसिक विकारांवर उपचारपद्धत म्हणून रुग्णांना मातीत अनवाणी चालणे किंवा बागकाम करणे, अशी कामे करण्यास सांगितले जाते. लागवडीत झाडांची जोपासना करतांना हे लाभ आपण नियमितपणे आणि सहज मिळवू शकतो.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१३.१२.२०२२)