हिंदु राष्ट्राच्या मागणीच्या गर्जनेचा आवाज देहलीपर्यंत पोचला पाहिजे ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची सहस्रो हिंदूंची मागणी !

श्री. सुरेश चव्हाणके

जळगाव – हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज देहलीत पोचला पाहिजे; कारण निर्णय तिथे होणार आहे. रावेरच्या आसपासच्या क्षेत्रात ना केवळ गोतस्करी होत आहे, तर गोरक्षकावर आक्रमणेही होत आहेत. येथील एकेका गोरक्षकाच्या रक्षणासाठी मी देहलीतून उभा आहे. येथील प्रसिद्ध केळी उत्पादक हिंदु शेतकर्‍यांचा व्यवसाय त्यांच्या हातून जाण्याची वेळ आली आहे. येथील ‘एरंडोलचा पांडववाडा गुढीपाडव्याच्या पूर्वी हिंदूंना सुपुर्द करा’, असे आवाहन या सभेच्या माध्यमातून मी आज करत आहे. ‘सिमी’चा गड राहिलेल्या, ‘लव्ह जिहाद्यां’चे आश्रयस्थान असलेल्या, जळगाव-खांडवा रेल्वेमार्गालगत दुतर्फा ‘भूमी जिहाद’ झालेल्या जळगावच्या या सभेसाठी मी मुद्दामहून आलो आहे. हा ‘खान’देश’ नव्हे, तर ‘कान्हादेश’ आहे. याचे महाभारतापासूनचे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे ४० सहस्र वर्षे जुना इतिहास असलेल्या या प्रदेशाला आजपासून ‘कान्हादेश’ म्हणायला आरंभ करा, असे आवाहन करून ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी उपस्थित सहस्रो हिंदूंकडून केंद्रशासनाकडे करावयाची ‘लव्ह जिहाद’च्या कायद्याची मागणी वदवून घेतली.

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री. सुरेश चव्हाणके, श्री. सुनील घनवट आणि कु. रागेश्री देशपांडे

२५ डिसेंबर या दिवशी जळगाव येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे प्रमुख वक्ते म्हणून श्री. चव्हाणके बोलत होते. सभेच्या निमित्ताने शहरात अनेक ठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले होते, तसेच या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी भगव्या टोप्या, भगवे ‘टी शर्ट’ परिधान केल्यामुळे जळगाव शहर भगवेमय झाले होते. राष्ट्रभावना जागृत करणार्‍या दमदार घोषणा देत हिंदुत्वनिष्ठ सभास्थळी प्रवेश करत असल्याने उपस्थित हिंदूंमध्ये उत्साह निर्माण झाला. या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला पुरोगामी आणि धर्मांध संघटना यांचा विरोध होऊनही सहस्रो हिंदूंनी उपस्थिती दर्शवून ‘जो हिंदू हितकी बात करेगा, वही देश पे राज करेगा !’ असा त्यांचा निश्चय पक्का केल्याचे सिद्ध केले.

देशाला इस्लामी किंवा ख्रिस्ती राष्ट्र होऊ द्यायचे नसल्यास आतापासून हिंदु राष्ट्रासाठी कार्य करण्यास आरंभ करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

हिंदु राष्ट्र जागृती सभेला पुरोगामी आणि धर्मांध संघटना यांच्या विरोधानंतर पद, पक्ष, संघटना, संप्रदाय सर्व बाजूला ठेवून सहस्रोंच्या संख्येने उपस्थित राहून हिंदूंच्या संघटितशक्तीचा ‘जळगाव पॅटर्न’ सिद्ध केला आहे. देशाची फाळणी ही धर्माच्या आधारावर झाली आहे. मुसलमानांसाठी पाकिस्तान दिला गेला, तर उर्वरित राष्ट्र हे ‘हिंदु राष्ट्र’ का नाही ? आज आम्हाला या देशाला इस्लामी, खलिस्तानी, ख्रिस्ती किंवा धर्मनिरपेक्ष राष्ट्र होऊ द्यायचे नसल्यास आतापासून हिंदु राष्ट्रासाठी कार्य करण्यास आरंभ करा. प्रतापगड येथील अफजलखानाच्या थडग्याजवळील अतिक्रमण काढण्यात आले, तसेच विशाळगड आणि माहीम येथील गडांवरील अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया चालू आहे; परंतु जोपर्यंत छत्रपतींचे सर्व गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त होत नाहीत, तोपर्यंत स्वस्थ बसू नका. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत सर्व गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त झाले नाहीत, तर शिवप्रेमी हे काम हाती घेतील.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्यासाठी साधना करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु नंदकुमार जाधव

येणारा काळ हा आपत्काळ आहे, असे अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनी सांगितले आहे. भूकंप, उष्णतेची लाट, महापूर, टोळधाड, वादळे यांसारख्या संकटांची मालिका चालू आहे. कालमहिम्यानुसार वर्ष २०२५ ला हिंदु राष्ट्र येणारच आहे. हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्यासाठी साधना करून धर्माचरणी बना.

चित्रपटांतून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन नको ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

कु. रागेश्री देशपांडे

सध्याच्या चित्रपटांचा समाजमनावर मोठा परिणाम होत आहे. युवा पिढी चित्रपटांप्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक चित्रपटांत धर्मांध युवक आणि हिंदु युवती यांची प्रेमकहाणी दाखवली जाते. यांतून एकप्रकारे ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहनच मिळत आहे. चित्रपटांतून होणारे ‘लव्ह जिहाद’चे प्रोत्साहन रोखायला हवे. हे जिहादी संकट रोखण्यासाठी हिंदु मुलींनी धर्माचरण करणे आवश्यक आहे.

अशी झाली सभा…

या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्या गावांतील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी श्री. अमोल वानखेडे यांनी केलेल्या शंखनादानंतर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. येथील वेदमूर्ती पुरुषोत्तम शुक्ल, भूषण मुळे, श्रीराम जोशी, प्रवीण जोशी, महेश जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी मांडला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी केले.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार’ या ग्रंथाचे प्रकाशन !

या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.