‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्यासाठी इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला हिंदु जनआक्रोश मोर्चा !

 पत्रकार परिषदेत उपस्थित विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी

इचलकरंजी, (जिल्हा कोल्हापूर), २२ डिसेंबर (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराचे वाढते प्रकार देशविघातक आहेत. त्यामुळे शासनाने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधात कायदा करावा, या मागणीसाठी समस्त हिंदु समाजाच्या वतीने इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला हिंदु जनआक्रोश मोर्च्याचे आयोजन केले आहे. हा मोर्चा दुपारी ३ वाजता राजर्षी शाहू महाराज पुतळ्यापासून प्रारंभ होणार असून मुख्य मार्गावरून गांधी पुतळा येथे पोचल्यावर मान्यवरांच्या मार्गदर्शनाने मोर्च्याची सांगता होईल. याच्या जनजागृतीसाठी बैठका, मेळावे चालू आहेत. या मोर्च्यासाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. गजानन महाजनगुरुजी आणि श्री. शिवप्रसाद व्यास यांनी पत्रकार परिषदेत केले. या वेळी सर्वश्री सनतकुमार दायमा, प्रवीण सामंत, सुजित कांबळे, मंगेश मस्कर, प्रसाद जाधव, सोमेश्वर वाघमोडे, बाळासाहेब ओझा, अरविंद शर्मा, गिरीश खुरबुडे, कुलदीप जैन, अमित कुंभार यांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.