कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय वैद्यकीय संघटनेकडून नारिकांना सावधगिरी बाळगण्याची सूचना !

नवी देहली – चीनमध्ये वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणावरून भारतातही सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. चीनमध्ये गतीने संक्रमित होत असलेल्या ‘ओमिक्रॉन बीएफ्.७’ या कोरोेना विषाणूच्या प्रकाराचे संक्रमण भारतातील ४ लोकांमध्येही झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘भारतीय वैद्यकीय संघटन’ने (‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने) नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची सूचना दिली आहे.

या पार्श्‍वभूमीवर ‘भारतीय वैद्यकीय संघटन’ने नागरिकांना पुढील सूचना दिल्या आहेत :

१. सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी (मास्क) वापरा.

२. सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) पाळा.

३. हात ‘सॅनिटायझर’ आणि साबण लावून धूत रहा.

४. राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांना जाऊ नका.

५. विदेश दौरे टाळा.

६. ताप, घसादुखी, खोकला अथवा अपचन यांचा त्रास होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

७. कोरोनाचे लसीकरण झाले नसल्यास लस घ्या, तसेच वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेतली नसल्यास तीही घ्या.