सांगली, २० डिसेंबर (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची वर्ष २०२३ ची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्री भीमाशंकर ते श्री शिवनेरी (मार्गे श्री वरसुबाई) अशी होत आहे. २८ जानेवारीला सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्री भीमाशंकर येथे पोचायचे आहे. २९ जानेवारीला पहाटे ५.३० वाजता श्री तुळजाभवानीमातेच्या आरतीने मोहिमेचा प्रारंभ होईल.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,
१. प्रत्येकाने ८ वेळ पुरेल एवढी शिदोरी, दोन जलकुंभ, पातळ सतरंजी-चादर आणावी. प्रत्येकाने नेहमीचा वेष आणि भारतीय पद्धतीची पांढरी टोपी घालावी. कानापर्यंत उंचीची काठी आणली पाहिजे. १ फेब्रुवारीला प्रत्येकाने ‘भगवा फेटा’ बांधला पाहिजे.
२. प्रत्येक धारकर्याने ५० रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे.
३. पूर्वसिद्धता म्हणून नित्य पळणे, जोर-बैठका, सूर्यनमस्कार करणे, ‘राजा श्री शिवछत्रपती’ ग्रंथाचे वाचन करावे.