बदलापूर येथील प.पू. कृष्णानंद सरस्वती यांच्या जन्मदिनानिमित्त २१ ते २७ डिसेंबर या काळात आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन !

ठाणे, १९ डिसेंबर (वार्ता.) – बदलापूर येथील रामगिरी आंबेशिव भागातील श्री रामदास आश्रमाच्या वतीने परमगुरु ब्रह्मर्षि नीलकंठ गुरुपादर यांच्या १२३ व्या अवतार जयंतीनिमित्त आणि संत प.पू. कृष्णानंद सरस्वती महाराज यांच्या २२ डिसेंबर या दिवशी असलेल्या जन्मदिनाचे औचित्य साधून या आश्रमात २१ ते २७ डिसेंबर या कालावधीत विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२१ डिसेंबरला नारायण नामजप, २२ डिसेंबरला ललिता सहस्रनाम अर्चना, संपूर्ण रामायण पाठ, महाप्रसाद, २३ डिसेंबरला व्यासपूजा आणि इतर पूजा, २४ डिसेंबरला श्रीमद्भागवत सप्ताह असे विविध कार्यक्रम होणार आहेत, तर २७ डिसेंबरला होणार्‍या ‘मंडळ पूजा महोत्सवा’त, ‘रामगिरी ते शबरीगिरी’ यात्रा, श्री शबरीगिरी अय्यप्पा महाआरती आदींसह अनेक हवन आणि पूजाविधी होणार असून यांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आश्रमाच्या आयोजकांनी केले आहे.