शाहरूख खान यांनी असाच चित्रपट प्रेषितांवर बनवून दाखवावा !

मध्यप्रदेशचे विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम यांचे आव्हान !

मध्यप्रदेशचे विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम

भोपाळ (मध्यप्रदेश) – शाहरूख खान यांनी त्यांच्या मुलीसह ‘पठाण’ चित्रपट पहावा आणि ते छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित करत संपूर्ण जगाला सांगावे. शाहरूख खान यांनी असाच चित्रपट प्रेषित यांच्यावर बनवून तो प्रसारित करून दाखवावा, असे मी त्यांना आव्हान देतो, असे विधान मध्यप्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गौतम यांनी केले. यापूर्वी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही ‘सदर चित्रपटात पालट केले नाहीत, तर त्यावर आम्ही बंदी घालू’, अशी चेतावणी दिली होती.

काँग्रेस नेत्यांचाही पठाण चित्रपटाला विरोध

विरोधी पक्षनेते डॉ. गोविंद सिंह यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनीही पठाण चित्रपटाला विरोध केला आहे. पचौरी म्हणाले की, हे सूत्र ‘पठाण’चे नाही, तर कपड्यांचे आहे. भारतीय संस्कृतीत कोणत्याही महिलेने अशा प्रकारे कपडे परिधान करून सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करणे योग्य नाही, मग ती हिंदु, मुसलमान किंवा इतर कोणत्याही धर्माची असो.