पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) येथील पोलीस अधिकार्‍याकडून शरीरसुखाची मागणी !

महिला हवालदाराचा आरोप

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – पन्हाळा पोलीस ठाण्यात यापूर्वी कार्यरत असलेल्या एका महिला हवालदाराने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन पन्हाळा पोलीस ठाण्यातील अधिकार्‍याने पोलीस ठाण्यातच शरीरसुखाची मागणी केल्याची लेखी तक्रार त्यांच्याकडे केली. संबंधित पोलीस अधिकारी विनाकारण लगट करणे, सकाळी फिरण्यासाठी गेल्यावर उलट-सुलट प्रश्न विचारणे, लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणे, असे प्रकार गेले ४ वर्षे करत आहे, असे त्या तक्रारीत नमूद केले आहे.

या संदर्भात पोलीस अधीक्षक म्हणाले, ‘‘संबंधित महिला हवालदार यापूर्वी पन्हाळा पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. या पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांच्या अहवालानुसार त्यांचे नुकतेच स्थानांतर करण्यात आले आहे. ’’

संपादकीय भूमिका

पोलीसच असे वागत असतील, तर महिला कधीतरी सुरक्षित राहू शकतील का ? अशा पोलिसांना कठोर शिक्षाच करायला हवी.