बाराबाभळी (नगर) येथे २ दिवसांच्या इज्तेमाचे आयोजन !

प्रतीकात्मक छायाचित्र

नगर – जिल्ह्यातील बाराबाभळी ग्रामपंचायत हद्दीतील जामिया मोहमदिया इशातुल उलूम मदरशाच्या मैदानात १६ डिसेंबरपासून २ दिवसांचा ‘इज्तेमा’ हा धार्मिक कार्यक्रम चालू झाला आहे. या इज्तेमासाठी जवळपास १ लाख मुसलमान येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर १०० एकर जागेत मंडप, तसेच वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असून आरोग्य व्यवस्था, ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था आणि मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज धर्मगुरूंनी मुसलमानांना मार्गदर्शन केले.

इज्तेमाच्या पार्श्वभूमीवर नगर पाथर्डी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मुसलमानांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, तसेच रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि रहदारी सुरळीत होण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी वाहतुकीत पालट केला आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नगर पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे.