मनावरचा ताण घालवण्यासाठी संशोधकांनी सांगितल्यानुसार शिव्या देण्यासारखा तामसिक प्रयोग न करता परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्यानुसार नामजपादी उपाय करणे श्रेयस्कर आहे !
‘एकदा माझ्या वाचनात एक लेख आला होता. त्या लेखात ‘आपल्या मनावरचा ताण आणि चिडचिडेपणा न्यून करण्यासाठी शिव्या देणे’, हा एक चांगला मार्ग आहे’, असे म्हटले होते. एखाद्या बलवान व्यक्तीने (आर्थिक किंवा शारीरिक दृष्टीने) एखाद्या कमजोर व्यक्तीवर अन्याय केला आणि त्या कमजोर व्यक्तीला जर त्या बलवान व्यक्तीच्या विरुद्ध काही करता येत नसेल, तर तेव्हा तिची मनातल्या मनात चिडचिड होते अन् तिला ताण येतो. काही वेळाने कमजोर व्यक्तीच्या मनात ‘त्या व्यक्तीला मारू कि त्याचा खून करू ?’, अशा प्रकारचे काहीतरी विचार येतात; परंतु तिला असे काहीही करता येत नाही. त्यामुळे तिचे मन आणि शरीर यांवरील ताण वाढत जातो.
एकदा संशोधकांनी एक प्रयोग केला. संशोधकांनी कमजोर व्यक्तीला अन्याय करणार्या व्यक्तीविषयी जोरजोराने शिव्या द्यायला सांगितल्या. त्यानंतर कमजोर व्यक्तीची तपासणी केली. तेव्हा कमजोर व्यक्तीने शिव्या दिल्यावर ‘तिच्या मनावरील ताण न्यून झाला आणि तिचा रक्तदाबही न्यून झाला’, असे त्या संशोधनातून आढळले.
मी याविषयी एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘तामसिक वृत्तीच्या संशोधकांनी हा तामसिक प्रयोग केला आहे. त्यामुळे हा योग्य नाही. मनावरील ताण घालवण्यासाठी व्यक्तीने नामजपादी उपाय करायला हवेत.’’
– डॉ. दीपक जोशी (निसर्गाेपचार तज्ञ), देवद, पनवेल.