मुंबई – ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह यांवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी दावा केला आहे. यावर १२ डिसेंबर या दिवशी केंद्रीय निवड आयोगापुढे सुनावणी झाली. दोन्ही गटांनी याविषयीची कागदपत्रे निवडणूक आयोगापुढे सादर केली; मात्र ही पहिली सुनावणी काही मिनिटेच चालली. पुढील सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले.