व्हॉट्सॲपवर ६ डिसेंबरला ‘शौर्य दिवस स्टेट्स’ ठेवल्याने हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना धर्मांधांची धमकी !

कोतवाली पोलिसांत ३ गुन्हे नोंद

नगर – अयोध्या येथील राममंदिर आणि बाबरी मशीद यांच्या संबंधाने श्री. ओंकार घोलप यांनी ‘६ डिसेंबर शौर्य दिवस’, असे व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवले होते. या विरोधात ‘मशीद बनवून आम्हीही शौर्य दिवस साजरा करू शकतो’, अशी हिंदी भाषेतील ऑडिओ क्लीप प्रसारित झाल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते बारातोटी कारंजा माळीवाडा येथे जमा झाले आणि त्यांनी घोषणा दिल्या. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच येथे साहिल गुलाम दस्तगोर, मोहसीन रफिक शेख, जमील नवाज बेग, सय्यद आवेज जाकीर उपाख्य बोबो, सय्यद परवेज जाकोर आणि अन्य ७-८ धर्मांध हातामध्ये दंडुके, लोखंडी गज घेऊन परिसरात फिरत होते. त्यांच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा नोंद झाला. येथे पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. तरीही धर्मांधांनी हातात शस्त्रे घेऊन परिसरात हिंडल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. ओंकार घोलप यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, असे संभाषण करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात तक्रार दिली आहे.