हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाडये यांचा ‘हलाल जिहाद’ संदर्भात सातारा जिल्हा जागृती दौरा !

तालुकास्तरावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समित्यां’ची स्थापना, तसेच व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार !

सातारा – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल जिहाद’च्या संदर्भात देशव्यापी जागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांचा सातारा जिल्ह्यात जागृती दौरा पार पडला. या वेळी ठिकठिकाणी व्यापारी, उद्योजक, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका आणि वैयक्तिक संपर्क यांद्वारे प्रबोधन करण्यात आले. या प्रबोधनामुळे सातारा, कराड, कोरेगाव आणि वडूज या तालुक्यांमध्ये ‘हलाल सक्तीविरोधी कृती समित्यां’ची स्थापना करण्यात आली. व्यापारी-उद्योजक यांनी ‘हलाल शिक्का’ असलेली उत्पादने विक्रीस न ठेवण्याचा, तसेच ‘हलाल’ संदर्भात व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार केला.

कराड येथे बैठकीस उपस्थित विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते
सातारा येथे बैठकीस उपस्थित विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते
वडूज येथे ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ या अभियानाअंतर्गत दीपप्रज्वलन करतांना धर्मप्रेमी
डबेवाडी येथील व्याख्यानास उपस्थित धर्मप्रेमी
जखीणवाडी येथील व्याख्यानास उपस्थित धर्मप्रेमी

१. सातारा, कराड, कोरेगाव आणि वडूज या तालुक्यांमधील हलाल सक्तीविरोधी कृती समितींतील धर्मप्रेमींनी पुढाकार घेऊन प्रशासनाला निवेदन दिले.

२. नेले केडगावचे सरपंच श्री. राजू शेळके यांनी त्यांच्या गावामध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.

३. सातारा येथील ‘संकल्प डेअरी’ आस्थापनाचे श्री. महादेव निकम, पाटीदार समाजाचे सर्वश्री सुयोग वनारसे, राजेंद्र आंबुले आणि कराड येथील उद्योजक श्री. राजेश चांडक यांनीही ‘जागृतीसाठी बैठका आयोजित करण्याचा प्रयत्न करू’, असे सांगितले.

४. नटराज मंदिर, तसेच करंजे, सातारा येथे आणि भैरवनाथ मंदिर, रघुनाथपूर (रहिमतपूर, तालुका कोरेगाव) येथे झालेल्या हलाल सक्तीविरोधी बैठकीस विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री प्रशांत जाधव, योगेश कापले, सागर आमले, हिंदु महासभेचे श्री. उमेश गांधी, अधिवक्ता दत्तात्रय सणस, ह.भ.प. क्षीरसागर महाराज, योग वेदांत समितीचे श्री. सतीश केसकर आदी उपस्थित होते.

५. वडूज येथे झालेल्या बैठकीत हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करण्याचा निश्चय केला.

६. डबेवाडी (तालुका सातारा) येथे झालेल्या व्याख्यानाच्या वेळी युवती आणि महिला यांचा विशेष सहभाग होता.

७. तारळे येथे ‘हलाल जिहाद आणि हिंदु राष्ट्र’, या विषयावरील व्याख्यानास ११५ हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

८. जखीणवाडी (तालुका कराड) येथे झालेल्या ‘हिंदु धर्मावरील संकटे’, या व्याख्यानास अनेक युवक उपस्थित होते.