केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !
कोची – येथे ३ डिसेंबर या दिवशी फारूख याने संध्या नावाच्या एका हिंदु तरुणीवर धारदार शस्त्राने आक्रमण करून तिचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला. संध्या ही मूळची बंगालची असून ती कामाच्या शोधात कोची येथे आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून फारूख याचा शोध चालू केला आहे. पीडितेवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
फारुख को संध्या पर था शक, बीच सड़क पर ‘सर तन से जुदा’ की कोशिश: धारदार हथियार से बोल दिया हमला, केरल पुलिस ने कहा – रिश्ते में अनबन का मामला#Kerala #Kochi #SarTanSeJudahttps://t.co/u8LhhTqYJ8
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 4, 2022
१. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पीडित तरुणी एका ‘ब्युटी पार्लर’मध्ये काम करते. होती. ही घटना घडली तेव्हा, पीडित तरुणी कलूर भागातील आझाद रोडवर एका ओळखीच्या व्यक्तीसोबत पायी जात होती.
२. या वेळी दुचाकीवरून आलेल्या फारूख याने संध्या हिच्यावर चाकूने आक्रमण केले. फारूख याला संध्याचा शिरच्छेद करायचा होता; पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या तिसर्या व्यक्तीने हस्तक्षेप केला.
३. या आक्रमणानंतर फारूख दुचाकीवरून पळून गेला. त्याने आक्रमणासाठी वापरलेला चाकू घटनास्थळीच सोडून दिला.
४. स्थानिकांनी घायाळ संध्याला जवळच्या रुग्णालयात भरती केले. फारूख आणि संध्या यांच्यात पूर्वीपासून संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.
५. संध्याचे दुसर्या तरुणाशी संबंध असल्याचा फारूखला संशय होता. तो मूळचा उत्तराखंड येथील आहे. तो कोचीमध्ये एका केशकर्तनालयात काम करतो.
संपादकीय भूमिकाधर्मांध किती उद्दाम झाले आहेत, हेच यातून दिसून येते. ‘केरळमध्ये साम्यवाद्यांचे सरकार असल्यामुळे फारूख शिक्षा मिळेल का ?’, हा प्रश्न सामान्य हिंदूंना भेडसावत आहे ! |