कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर) येथे अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त !

प्रतिकात्मक छायाचित्र

कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर) – येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकून अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ३ डिसेंबर या दिवशी पोलिसांनी वेशांतर करून हर्षल शिवाजी लोकरे आणि सुभाष दिगंबर काळे या २ जणांना कह्यात घेतले आहे. या बनावट नोटा कुठे पाठवण्यात येत होत्या ?, तसेच त्याचा सूत्रधार कोण ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत. पोलिसांच्या पथकाने कुर्डूवाडी-टेंभुर्णी रस्त्यावर २ सापळे रचून संशयितांना पकडले.