इंदूर (मध्यप्रदेश) येथे अल्पवयीन हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या २ बांगलादेशी मुसलमानांना अटक !

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील सिरपूर तलाव भागात २ अल्पवयीन हिंदु मुलींसमवेत अश्‍लील कृत्य करणार्‍या दोघा बांगलादेशी तरुणांना अटक करण्यात आली. या मुलींना बांगलादेशी तरुण प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होते, असा आरोप करण्यात आला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना या तरुणांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. हे दोघे इंदूरमध्ये नोकरी करत होते.

१. बजरंग दलाच्या वतीने शहरात ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार रोखण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. त्यासाठी बजरंग दलाची पथके स्थानिक कॅफे, उपाहारगृहे, उपवन आणि सहलीची ठिकाणी येथे लक्ष ठेवत आहेत. यांपैकीच एका पथकाने सिरपूर तलावावर जाऊन पहाणी केली. तेव्हा या तलावावर दोन युवक दोघा मुलींसमवेत अश्‍लील कृत्य करतांना आढळून आले.

२. या युवक आणि मुली यांच्याकडे बजरंग दलाच्या पथकाने ओळखपत्र मागितले. अधिक कठोरपणे त्यांना विचारणा केली असता हे तरुण मुसलमान, तर मुली हिंदु असल्याचेे समजले. त्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावले आणि युवकांना त्यांच्या कह्यात दिले.

३. संबंधित मुलींना विचारणा केली असता, हे तरुण त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याच्या प्रयत्नात होते. लग्नासाठी हे तरुण मुलींवर दबाब टाकत होते, अशीही माहिती उघडकीस आली. हे दोघेही ज्या ठिकाणी नोकरी करत होते, तिथेच या हिंदु मुलीही कामाला होत्या.

४. तरुणांच्या चौकशीत ते बांगलादेशी मुसलमान असल्याचे समोर आले. हे तरुण बांगलादेशातून इंदूर येथे कसे पोचले, याचा पोलीस तपास करत आहेत.

५. या संपूर्ण प्रकरणी बजरंग दलाचे आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापुढे असा प्रकार आढळून आला, तर संबंधित तरुणांना चोप देण्यात येईल, अशी चेतावणी दिली आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई कधी होणार ?