ठाणे – मुरबाड तालुक्यातील सायले येथील डोईफोडी नदीपात्रात अवैधरित्या विहिरीचे बांधकाम केल्याप्रकरणी तलाठी संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कामगार नेते आणि धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांचा मुलगा ऋग्वेद यांच्या विरोधात टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. आता याच प्रकरणात राजन राजे यांच्या विरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विहिरीतून राजन राजे यांनी स्वतःच्या मालकीची शेती आणि शेतघरासाठी पाणी वापरल्याने त्यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.