‘दफनभूमी हटवा, प्राचीन शिवमंदिराचे पावित्र्य टिकवा’, अशी हाक देत अंबरनाथ येथे आज निषेध मोर्चा !

ठाणे, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात मोठ्या संख्येने नागरिक येतात; मात्र शिव मंदिर परिसराला लागून असलेल्या कैलास कॉलनी चौक परिसरातील जागा उल्हासनगर महानगरपालिकेने मुसलमानांना दफनभूमीसाठी दिली आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. याचा निषेध करण्यासाठी येथील ग्रामस्थ आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ नागरिक यांच्या वतीने २९ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या निषेध मोर्च्याचा प्रारंभ प्राचीन शिवमंदिर येथून होणार असून नंतर हा मोर्चा उल्हासनगर ५ क्रमांक, तहसीलदार कार्यालय येथून मार्गक्रमण करत उल्हासनगर महानगरपालिकेजवळ मोर्च्याची सांगता होईल. ‘दफनभूमी हटवण्यासाठी, तसेच प्राचीन शिव मंदिर, विसर्जन घाट आणि वालधुनी नदी यांचे पावित्र्य अन् अस्मिता टिकवण्यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ नागरिकांनी या निषेध मोर्च्यात सहभागी व्हावे’, असे आवाहन करण्यात आले आहे.