ठाणे पोलिसांनी केलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’मध्ये १८४ जणांना अटक !

ठाणे, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी मध्यरात्री ‘ऑल आऊट कोंबिंग ऑपरेशन’ केले. ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी १७७ गुन्हे नोंद केले असून यात १८४ जणांना अटक केली आहे. यात अवैध शस्त्रजप्ती, अग्नीशस्त्रे जप्ती, पसार असलेल्या आरोपींना अटक करणे, पॅरोल आदेशाचा उल्लंघन केलेल्या आरोपींचा शोध घेणे, वाहने पडताळणे, अभिलेखावरील गुंडांचा शोध घेणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणार्‍यांवर कारवाई करणे अशा प्रकारच्या कारवाईचा सामावेश होता. या वेळी उपाहारगृह, डान्सबार, पब, हुक्का पार्लर येथेही कारवाई केली. अवैध शस्त्रास्त्र बाळगणार्‍या, अवैध आस्थापने चालवणार्‍या, जुगार खेळणार्‍या, तसेच अमली पदार्थ तस्करी करणार्‍या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. (कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच गुन्हेगार गुन्हे करण्याचे धाडस करत आहेत. – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • वाढत्या गुन्हेगारीला पोलिसांची निष्क्रीयताच कारणीभूत आहे !
  • १८४ जणांचा गुन्हेगारीत सहभाग होईपर्यंत पोलीस का थांबतात ? त्या त्या वेळी गुन्हेगारांवर कारवाई का केली जात नाही ?