तिहार कारागृहात ‘आप’चे मंत्री सत्येंद्र जैन यांची मालीश करणारा बलात्काराचा आरोपी ! – तिहार कारागृह प्रशासनाची माहिती

‘आप’ने मालीश करणारा फिजियोथेरेपिस्ट असल्याचा केला होता दावा !

नवी देहली – येथील तिहार कारागृहात आर्थिक अपव्यवहाराच्या आरोपावरून अटकेत असलेले देहलीतील आम आदमी पक्षाचे मंत्री सत्येंद्र जैन कारागृहात मालीश करून घेत असलेला एक व्हिडिओ यापूर्वी समोर आला होता. त्या वेळी ‘आप’कडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणामध्ये ‘जैन यांना उपचारासाठी फिजियोथेरेपिस्टकडून मालीश करण्याची अनुमती आहे’, असे म्हटले होते; मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार व्हिडिओमध्ये जी व्यक्ती जैन यांचे मालीश करत होती, ती व्यक्ती बलात्काराच्या प्रकरणी याच कारागृहात अटकेत असलेला आरोपी आहे. या आरोपीचे नाव रिंकू आहे. तिहार कारागृहाच्या अधिकृत सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

सगळे राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी असतात, हे लक्षात घ्या ! आम आदमी पक्षाची स्थापना भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी झाली आणि त्याआधारे २ राज्यांत ती सत्तेवरही आली; मात्र भ्रष्टाचार नष्ट करण्याऐवजी स्वतःच भ्रष्टाचार करू लागली, हेच यातून लक्षात येते !