मंगळुरू बाँबस्फोटातील जिहादी आतंकवाद्याने यापूर्वी हिंदूंवर केले होते वार !

जिहादी आतंकवादी शारिक

मंगळुरू (कर्नाटक) – येथे रिक्शात झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला जिहादी आतंकवादी शारिक हा यापूर्वीही जिहादी कारवायांमध्ये सहभागी होता, अशी माहिती समोर आली आहे. १५ ऑगस्ट २०२० या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फ्लेक्स फलक लावण्यावरून झालेल्या वादाच्या वेळी त्याने २ जणांवर चाकूने वार झाले होते. या आक्रमणात शारिकचाही सहभाग होता. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती, तर शारिक पसार होता. २६/११ च्या मुंबई वरील जिहादी आतंकवादी आक्रमणाला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या एक दिवसानंतर २७ नोव्हेंबर २०२० या दिवशी मंगळुरूमधील एका भिंतीवर ‘आम्हाला एल्ईटीला (लष्कर-ए-तोयबा) बोलावण्यास भाग पाडू नका’ असे शारिक याने लिहिले होते. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.

हिंदु व्यक्तीच्या नावाने बनावट आधारकार्ड बनवून भाड्याने घेतले होते घर !

कर्नाटकचे आरोग्यमंत्री सुधाकर यांनी सांगितले, ‘शारिक रिक्शात बसल्यावर चालकाला तो हिंदु असल्याचे सांगत होता. त्याने यासाठी त्याच्याकडील आधारकार्डही दाखवले होते. हे आधारकार्ड एका रेल्वे कर्मचार्‍याचे होते. ते हरवले होते. त्याच्या नावाने शारिक याने बनावट आधारकार्ड बनवून घेतले होते.’ याच कार्डच्या आधारे त्याने हिंदुबहुल भागात भाड्याने घर घेतले होते.