लक्ष्य केले जाण्याच्या शक्यतेने न्यायाधीश आरोपींना जामीन देण्यास घाबरतात ! – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

नवी देहली – आरोपींना जामीन देण्यासाठी न्यायाधीश अनिच्छुक आहेत. याचे कारण हे नाही की, ते गुन्हा काय आहे, हे समजून घेत नाहीत. ‘गंभीर गुन्ह्याच्या संदर्भात आरोपीला जामीन दिला, तर आपल्याला लक्ष्य करण्यात येईल’, ही भीती त्यांना असते, असे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले. ते येथे बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.  या वेळी केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते.