नाशिक येथील गोदावरीचीही प्रतिदिन होणार आरती !

नाशिक – वाराणसीमधील शरयू आरतीच्या धर्तीवर नाशिक येथील गोदावरीची प्रतिदिन सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी केली आहे. यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी संमत झाला असून ११ हून अधिक पुजार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे. नाशिक येथील कुंभमेळा जवळ आला असतांना शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.