हिंदु मुलींना धर्मशिक्षण देणे नितांत आवश्यक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

देहलीत श्रद्धा वालकर या तरुणीचे आफताब याने तुकडे केल्याचे प्रकरण

‘टिकली’वर ‘श्रद्धा’ असती, तर आज ‘श्रद्धा’ टिकली असती !’

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

मुंबई – आफताब आणि अब्दुल यांच्या प्रेमात पडल्यावर मुलीच्या आयुष्याचा शेवट कसा होतो, हे सर्व पालकांनी आपापल्या मुलींना निश्‍चित सांगावे. अशाप्रकारे जागृती केल्याखेरीज ‘लव्ह जिहाद’ला आळा बसणार नाही. हिंदु मुलींना धर्मशिक्षण देणे नितांत आवश्यक आहे. प्रतिदिन एक ‘श्रद्धा’ जिहादला बळी पडत आहे. इतर वेळी महिलांसाठी लढण्याचे सोंग करणारे तथाकथित विचारवंत हे गुन्हेगार असणार्‍या आफताबचा धर्म पाहून तोंड बंद करून बसले आहेत. हिंदूंनी अशा खोट्या विचारवंतांचा खरा तोंडवळा लक्षात घ्यावा, असे ट्वीट श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी देहलीतील श्रद्धा वालकर हिच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी केले आहे. यासह त्यांनी ‘टिकली’वर ‘श्रद्धा’ असती, तर आज ‘श्रद्धा’ टिकली असती !’, अशी एक पोस्ट करून त्यावर ‘कटुसत्य’ असे लिहिले आहे.