खरेतर फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात हिंदूंनी याचिका केली पाहिजे होती !

‘चित्रपट निर्मात्या रोशनी अली यांनी दिवाळी आणि श्री महाकालीदेवीच्या पूजेच्या वेळी फटाके फोडण्यावर बंगाल राज्यात बंदी घालण्यात यावी, यासाठी पुन्हा कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी त्यांनी केलेल्या याचिकेवर निकाल देतांना कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमध्ये फटाके फोडण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर या निकालाला फटाके उत्पादकांकडून आव्हान देण्यात आल्यावर सर्वाेच्च न्यायालयाने ही बंदी रहित केली होती.’ (नोव्हेंबर २०२१)