चंद्रपूर येथे आरोपी हत्या केलेल्या तरुणाचे शीर घेऊन ‘फुटबॉल’प्रमाणे खेळले !

चंद्रपूर, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील दुर्गापूर महाऔष्णिक वीजकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ पूर्व वैमनस्यातून ८ जणांच्या टोळीने एकाचे शीर धडावेगळे केले आणि त्याच्या समवेत ते ‘फुटबॉल’प्रमाणे खेळले. (ही तर क्रौर्य आणि विकृतपणा यांची परिसीमा ! अशांना आजन्म कारावासाची शिक्षा द्यायला हवी ! – संपादक) ७ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता महेश मेश्राम (वय ३२ वर्षे) आणि आरोपी यांच्यात वाद झाला. त्यानंतर महेश यांच्या हत्येची घटना घडली. दुर्गापूर पोलिसांनी पळून जाणार्‍या ८ आरोपींना कह्यात घेतले असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.