इराणमधील महिलांच्या हिजाबविरोधी प्रदर्शनाचे प्रकरण
कोळीकोड (केरळ) – येथील टाऊन हॉलच्या समोर मुसलमान महिलांच्या एका समूहाने ६ नोव्हेंबर या दिवशी हिजाब जाळून विरोध प्रदर्शन केले. भारतात हिजाब जाळण्याची ही पहिलीच घटना आहे. इराणमध्ये तेथील सरकारच्या विरोधात गेल्या काही आठवड्यांपासून तेथील महिला जोरदार आंदोलन करत आहेत. सरकारच्या हिजाब घालण्याच्या अनिवार्यतेला विरोध करण्यात येत आहे. या आंदोलनालाच केरळमधील मुसलमान महिलांनी हिजाब जाळून स्वत:चे समर्थन घोषित केले आहे.
Kerala: Muslim women burn hijab to show solidarity with the anti-hijab movement in Iranhttps://t.co/SDp1212SJx
— OpIndia.com (@OpIndia_com) November 7, 2022
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कोळीकोडमध्ये ‘युक्तीवादी संगम’ या संघटनेच्या वतीने ‘सायन्स अँड फ्री थिंकिंग’ (विज्ञान आणि मुक्त विचार) नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अंतर्गतच हिजाबविरोधी आंदोलन करण्यात आले.
काय आहे प्रकरण ?
१६ सप्टेंबर २०२२ या दिवशी इराणमध्ये महसा अमिनी नावाच्या २२ वर्षीय युवतीने हिजाब परिधान न केल्याने तिला अटक करण्यात आली होती. ‘पोलिसांनी तिला केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला’, असा आरोप करत गेल्या दीड मासापासून इराण सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ही आंदोलने हिंसात्मकही होत चालली आहेत. आंदोलनात हिजाब फेकून, जाळून आणि स्वत:चे केस कापून महिला सरकारविरोधी निषेध नोंदवत आहेत. इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्लाह खोमेनी यांची छायाचित्रेही जाळण्यात येत आहेत. या आंदोलनाला जगभरातून समर्थन मिळत आहे.
संपादकीय भूमिकाकर्नाटकात या वर्षाच्या आरंभी झालेल्या हिजाब वादावरून मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास समर्थन देणारी पुरो(अधो)गामी टोळी इराणमध्ये गेल्या दीड मासापासून चालू असलेल्या तेथील सरकारच्या विरोधातील आंदोलनावरून तेथील सरकारला पाठिंबा देत नाही, हे जाणा ! |