सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गरीब आणि दुर्बल घटकांना आधार मिळेल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

र्वोनोकरी आणि शैक्षणिक प्रवेश यांत आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण मिळणार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्याविषयीच्या दिलेल्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. सर्व जाती-धर्म यांतील गरीब आणि दुर्बल घटकांना यामुळे आधार मिळेल. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय गोरगरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपयोगी ठरणार आहे, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नोकरी आणि शैक्षणिक प्रवेश यांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा केंद्रशासनाचा निर्णय ७ नोव्हेंबर या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला. सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय घटनापिठाने हा निर्णय दिला.