निवडणुकीला उभे रहाणारे उमेदवार ‘जनतेला सर्व काही विनामूल्य देऊ’ अशी आश्वासने देतात. ही आश्वासने जनतेचे कल्याण व्हावे म्हणून नाही, तर स्वतः निवडून यावे म्हणून वा सत्ता आपल्या हाती यावी म्हणून दिलेली असतात; परंतु या पद्धतीने उमेदवार मतांची भीक मागून स्वतः भिकारी होतो. सत्तेत आल्यावर तो व्यापारी दृष्टीने जनतेच्या पैशांची लूट करतो अन् जनतेला भिकेला लावतो. त्यामुळेच ‘कावळा जसा पापी माणसाच्या पिंडाला शिवत नाही’, त्याचप्रमाणे सूज्ञ नागरिकांनी मतांची भीक मिळावी; म्हणून जे पैसे वाटले जातात, त्या पैशांना स्पर्शही करू नये. फुकट मिळालेले पैसे घेतले असता माणसाकडील ‘स्वावलंबन’ हा सद्गुण नष्ट होतो, तसेच त्यामुळे माणूस आंब्याच्या झाडावरील बांडगुळाप्रमाणे होतो. नेत्यांनी मत द्यावे म्हणून वाटलेले पैसे घेतल्याने मतदारराजाची अधोगती होते !
– श्री. विजय (नाना) विष्णु वर्तक (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), नागोठणे, रायगड (४.११.२०२२)