एस्.टी.ची हंगामी दरवाढ मागे; परंतु खासगी वाहनचालकांची दरवाढ ‘जैसे थे’ !

सातारा, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – दीपावलीच्या निमित्ताने एस्.टी. महामंडळाने हंगामी दरवाढ केली होती. त्याचवेळी खासगी वाहतूकदारांनीही भाडेवाढ केली होती; मात्र एस्.टी. महामंडळाने केलेली दरवाढ मागे घेतली असली, तरी खासगी वाहनचालकांनी दरवाढ मागे घेतलेली नसल्यामुळे खासगी वाहनचालकांचे दर ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त केला जात असून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

संपादकीय भूमिका

खासगी वाहनचालकांवर कुणाचा अंकुश कसा नाही ? त्यांनाही दरवाढ मागे घेण्यास लावायला हवे, असेच जनतेला वाटते !