आपले गाव हिंदु राष्ट्र बनवण्याचा निर्धार करा ! – प्रशांत जुवेकर, जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

चातुर्मासानिमित्त वारकरी भजनी मंडळ आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

श्री. प्रशांत जुवेकर

जळगाव (वार्ता), ७ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु समाज, संस्कृती, परंपरा, हिंदूंची श्रद्धास्थाने आदींचे केवळ रक्षण नव्हे, तर त्यांचे जतन आणि संवर्धन करायचे असल्यास या भारतभूमीला हिंदु राष्ट्र केल्याविना तरणोपाय नाही. सध्याची सेक्युलर म्हणजे नि(अ)धर्मी व्यवस्था ही हिंदुहिताची नाही. यासाठी ‘आरंभ हा आपल्या गावापासून करायला हवा’, असा विचार करून प्रत्येक धर्मप्रेमी हिंदूने आपले गाव हिंदु राष्ट्र बनवण्याचा निर्धार करायला हवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. गोंडगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) येथे चातुर्मासानिमित्त आयोजित जाहीर कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाला समितीच्या वतीने श्री. दुर्गाप्रसाद पाटील यांनीही संबोधित केले. या कार्यक्रमाचे आयोजन वारकरी भजनी मंडळ आणि समस्त गोंडगाव ग्रामस्थ यांनी केले होते.

कार्यक्रमाच्या आयोजनात श्री. उमेश ठोंबरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला सनातन संस्थेचे श्री. अविनाश पंडित हेही उपस्थित होते. कार्यक्रमाला दीपप्रज्वलनाने आरंभ झाला. वेदमूर्ती अमित नाईक यांनी वेदमंत्रपठण केले.

ग्रामस्थांनी केलेले निर्धार ! 

१. ३१ डिसेंबरला शुभेच्छा न देता नववर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी साजरे करणार !

२. वाढदिवस हिंदु संस्कृतीनुसार साजरा करणार !

३. ‘हलाल’प्रमाणित वस्तू विकत घेणार नाही !