‘देवतांचे विडंबन करणाऱ्या फटाक्यांची विक्री करण्यावर बंदी असतांनाही नागपूर जिल्ह्यातील वेलतूर येथील फटाक्यांच्या दुकानांत देवतांची चित्रे असलेले फटाके विक्रीस ठेवण्यात आले होते. हे निदर्शनास येताच राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या विदर्भ प्रांताच्या वतीने परिषदेचे विदर्भप्रमुख ह.भ.प. ओमदेव महाराज चौधरी यांनी पोलीस ठाण्यात याविषयी निवेदन दिले. यानंतर पोलिसांनी देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री केली जाणारी ३ दुकाने बंद केली.’