खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्याप्रमाणे पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे महाराष्ट्रातील एकाही खासदाराला का वाटत नाही ?

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

‘माझे अधिवक्ता सहकारी श्री. विशेष कनोडिया आणि मी पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर राज्य सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवक्ता कनोडिया लवकरच ‘विश्व हिंदु संघम्’चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संखे यांच्यासमवेत पंढरपूरला जाणार आहेत’, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून दिली आहे.’