हिंदु संघटनांना कळते ते पोलिसांना कळत कसे नाही ?

झोपलेले पोलीस !

‘परतवाडा (जिल्हा अमरावती) येथील ‘अंबिका लॉन’मध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मेळघाटातील आदिवासी गावांसह महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या गावांतील, काटोल (जिल्हा नागपूर) येथील, तसेच मध्यप्रदेशातील आदिवासी, दलित आणि इतर समाज यांच्या सहस्रो नागरिकांना विशेष प्रलोभन देऊन आणण्यात आले होते. या कार्यक्रमाविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना समजल्यावर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर परतवाडा पोलिसांनी कार्यक्रमात हस्तक्षेप केला. त्यामुळे संबंधित ख्रिस्ती संयोजकांना हा कार्यक्रम रहित करावा लागला.’