६१ टक्के आध्यात्मिक पातळीची बालसाधिका कु. शर्वरी कानस्कर (वय १५ वर्षे) हिला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘निर्विचार’ या नामजपातील सामर्थ्याची आलेली प्रचीती

‘निर्विचार’ हा नामजप करण्यापूर्वी एकदा माझ्या मनात विचार आला, ‘मन निर्विचार होण्यासाठीही ‘निर्विचार’ असा नामजप करावा लागतो. म्हणजे मन निर्विचार करायला मनात ‘निर्विचार’चा विचार घालावा लागतो.’ त्यानंतर मी पुढील प्रयोग करून पाहिला. 

कु. शर्वरी कानस्कर

१. ‘निर्विचार’ हा नामजप न करता मन स्थिर आणि निर्विचार करणे

‘निर्विचार’ हा नामजप न करता मी मन स्थिर आणि निर्विचार करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा माझे मन निर्विचार होत नव्हते. त्या वेळी ‘माझ्यात स्वभावदोष आणि अहं असल्यामुळे स्वयंसूचनांचे सत्र केल्याशिवाय माझे मन निर्विचार होत नाही’, असे माझ्या लक्षात आले.

२. ‘निर्विचार’ हा नामजप केल्यानंतर मनातील विचारांच्या संख्येत घट होणे

नंतर ‘निर्विचार’ हा नामजप करण्यापूर्वी मी ‘माझ्या मनात विचारांची संख्या किती आहे ?’, याचे चिंतन केले. तेव्हा ‘हा नामजप करण्यापूर्वी मनातील विचारांची संख्या ९० ते १०० टक्के आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी केवळ १० – १५ मिनिटे ‘निर्विचार’ हा नामजप एकाग्रतेने केला. त्या वेळी ‘विचारांच्या संख्येत घट होऊन ती ४० टक्के न्यून झाली’, असे माझ्या लक्षात आले.

तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘श्री निर्विचाराय नमः ।’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘निर्विचार’, या सर्व नामजपांमध्ये पुष्कळ सामर्थ्य आहे’, हे माझ्या लक्षात आले.

‘हे गुरुदेवा, विविध नामजपांच्या माध्यमांतून तुम्हीच आम्हाला अनुभूती देत आहात. हे नामजप ठाऊक नसते, तर या आपत्काळात मन ‘निर्विचार’ करणे आम्हाला कठीण झाले असते. गुरुदेवा, आपल्या चरणी कृतज्ञता !’

गुरुदेवांची,

– कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.६.२०२२)


कु. शर्वरी हेमंत कानस्कर हिला विज्ञानातील शिक्षण आणि अध्यात्मातील ज्ञान यांत जाणवलेला भेद !

‘गुरुदेवा, मला सतत शिकण्याच्या स्थितीत ठेवून आपल्या चरणी स्थिर ठेवा. गुरुदेवा, आपणच मला हे सर्व सुचवले’, यासाठी आपल्या चरणी कृतज्ञता !’

– गुरुदेवांची,

कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे)  (३०.३.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक