कार्यक्रमातून मिळणारा पैसा जिहादी संघटनेच्या शाखेला दिला जाणार !

न्यूयॉर्कमध्ये पाकमधील पूरग्रस्तांना साहाय्य म्हणून दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तानमध्ये पूरग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी येथे एका दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातून मिळणारा पैसा पाकमधील ‘अल खिदमत फाऊंडेशन’ या जिहादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’च्या धर्मदाय शाखेला देण्यात येणार आहे. जमात-ए-इस्लामी या संघटनेनेच बांगलादेशात वर्ष १९७१ मध्ये लाखो हिंदूंची हत्या केली होती. न्यूयॉर्क येथील ‘द बेल हाऊस’मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘स्टॉप हिंदू हेट अ‍ॅडव्होकसी नेटवर्क’कडून याला पहिल्यांदा विरोध करण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमावर सामाजिक माध्यमांतून टीका होऊ लागली आहे. टीका झाल्यानंतर ‘द बेल हाऊस’कडून कार्यक्रमाच्या संदर्भातील ट्वीट पुसण्यात आले आहे.

२३ ऑक्टोबरला हा संगीत कार्यक्रम होणार आहे. यात आरती गोलापुडी, माया देशमुख, अपर्णा नानचेरला, सुनीता मणि, प्रोमा खोसला, पूजा रेड्डी, जुबी अहमद आदी  कला सादर करणार आहेत. (हिंदु धर्माचे खरे वैरी हे हिंदूच होत, असेच यातून म्हणावे लागेल ! – संपादक) या कार्यक्रमाच्या तिकिटाचा दर १ सहस्र ६२७ भारतीय रुपये ठेवण्यात आला आहे.

जमात-ए-इस्लामीचा हिंदुद्वेष !

‘राबा टाइम्स’च्या वर्ष २०१८ च्या वृत्तानुसार जमात-ए-इस्लामीचा प्रमुख सिराज-उल हक याने पाकिस्तानमध्ये मंदिराच्या बांधकामासाठी तेथील लोकांच्या पैशाचा वापर करण्यास विरोध केला होता. हक याच्यानुसार पाकमधील सर्व करदाते मुसलमान आहेत. त्यामुळे त्यांचा पैसा शरीयतनुसारच खर्च केला पाहिजे.

सिराज-उल हक याच्यावर पाकमधील हिंदु कार्यकर्ते कपिल देव यांनी ट्वीट करून म्हटले होते की, पाकमध्ये ५० लाख हिंदु करदाते आहेत. त्यांच्या पैशाने मंदिर बांधले जाईल.

संपादकीय भूमिका 

हा कार्यक्रम रहित करण्यासाठी हिंदू आणि त्यांच्या संघटनांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे !