के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गर किंग यांच्याकडून ‘हलाल’ पदार्थांची मुसलमानेतरांना विक्री न करण्याची मागणी !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानाच्या अंतर्गत आंदोलन

भाग्यनगर (तेलंगाणा) – हिंदु जनजागृती समितीकडून ‘हलालमुक्त दिवाळी’ या मोहिमेच्या अंर्तगत येथील के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गर किंग आदी आस्थापनांच्या दुकानांच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.

या दुकानांनी त्यांच्याकडून हलाल पदार्थांची मुसलमानेतरांना विक्री करू नये, अशी या वेळी मागणी करण्यात आली. या दुकानांनी त्यांच्या दुकानाबाहेर ‘हलाल आणि हलाल नसलेले खाद्यपदार्थ मिळतात’, असा फलक लावण्याचीही मागणी करण्यात आली.

या संदर्भात या दुकानांना एक निवेदन देण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी विश्‍व हिंदु परिषद, बजरंग सेना, राष्ट्रीय शिवाजी सेना, एस्व्हीबी धर्मसेना आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.