दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन यांच्या लेखाचे शीर्षक वाचल्यावर साधकाला सुचलेली कविता !

‘३०.३.२०२० या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन या साधिकांचा लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखातील ‘शबरीसारखी उत्कट भक्ती करून आणि स्वतःतील स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करून श्रीरामनवमीला अंतरात रामराज्य अनुभवूया !’ हे शीर्षक मी वाचले. त्या वेळी कृतज्ञता म्हणून ‘आमच्या कन्येसम असलेल्या या साधिकांविषयी काहीतरी लिहावे’, असे देव मला आतून सुचवत होता. तेव्हा देवाने मला ‘पूर्वजन्मीच्या गार्गी अन् मैत्रेयी’ हे शीर्षक सुचवले. त्यानेच माझ्याकडून खालील पद्यही लिहून घेतले. ते त्याच्याच चरणी समर्पित करत आहे.

पूर्वजन्मीच्या गार्गी अन् मैत्रेयी ।

श्री. संजय घाटगे

तुम्ही तर ‘गार्गी अन् मैत्रेयी’ पूर्वजन्मीच्या ।
वैष्णवी (टीप १) अन् योगिता (टीप २) ।
शबरीसम असे तुमची भोळी भक्ती ।
म्हणूनच रामनाथीच्या रामास (टीप ३) ।
भावते अधिकच ती ।। १ ।।

साधकांनी तुमच्याकडून शिकावे ।
ही गुरुदेवांची नित्य तळमळ असते ।
म्हणूनच दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ।
आपल्या दोघींची छबी वारंवार झळकते ।। २ ।।

‘सनातन प्रभात’ हे जणू गुरुदेवांचे ‘हृदय’ असे ।
प्रीतीस्वरूप गुरुदेवांच्या हृदयात तुम्हा स्थान असे।
भावस्थितीत मजला असे प्रतीत होते ।
कधी कधी या भावामुळेच मजला भासते ।। ३ ।।

जरी या जन्मी आहात तुम्ही वैष्णवी अन् योगिता ।
परी प्रत्यक्षात आहात, ‘गार्गी अन् मैत्रेयी’ पूर्वजन्मीच्या ।
तुमच्यासम ‘भाव’ मजमध्येही निर्माण व्हावा ।
म्हणून मी शरणागतीने नमन करतो श्रीकृष्णाला ।। ४ ।।

टीप १ : कु. वैष्णवी वेसणेकर

टीप २ : कु. योगिता पालन

टीप ३ : रामनाथी आश्रमात वास्तव्याला असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले

– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. (३०.३.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक