‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहातांना आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांना स्फुरलेल्या कविता !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन खंड – १’ या ग्रंथातील छायाचित्रे पहातांना ‘साधकांच्या ठिकाणी मीच आहे’, असे अनुभवत होते. तेव्हा माझा गुरुदेवांशी संवाद चालू झाला. त्यांच्याच कृपेने मला सुचलेल्या भावओळी पुढे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे

धन्य जाहलो आपुल्या दर्शने ।

तुम्हीच जगाचे नियंता । तुम्हीच आमुचे त्राता ।।
तुम्ही असता संगती (सोबती) ।
आम्हा काय कुणाची भीती ।। १ ।।

तुम्हीच दिली शक्ती । भोगण्या प्रारब्ध आमुचे ।।
संकटकाळीही अनुभवली आम्ही ।
क्षणोक्षणी आपुली प्रीती ।। २ ।।

निःशब्द झाली मने । धन्य जाहलो आपुल्या दर्शने ।।
बोल माऊलीचे कानी पडता ।
कृतार्थ झालो जीवनी ।। ३ ।।

कृपाकटाक्षाने तुझ्या, उद्धार माझा झाला ।

किती जन्मांचे पुण्य फळा आले ।
अन् गुरुचरणांशी स्थान मिळाले ।
आता दुजी आस न राहो ।
या चरणांमध्ये विलीन व्हावे ।। १ ।।

पावन झालो भगवंता । स्पर्श तुझा झाला ।
ओंजळीत तुझ्या मला विसावा मिळाला ।। २ ।।

धन्य झालो भगवंता । दृष्टी तुझी पडता ।
कृपाकटाक्षाने तुझ्या, उद्धार माझा झाला ।। ३ ।।

रामभेटीचा आनंद आगळा ।

रामभेटीचा आनंद आगळा ।
या कलियुगातही गुरुमाऊलीने मजला दिला ।। १ ।।

रामराज्याच्या स्थापनेत । खारीचा वाटा मजला दिला ।। २ ।।

समर्पित करून घे जीवन । गुरुमाऊली राष्ट्र-धर्म कार्यासाठी ।
घडो चरणसेवा तुझी युगायुगांतरी ।। ३।।

वाटे फुलपाखरू व्हावे ।

वाटे फुलपाखरू व्हावे ।
अन् गुरुदेवांच्या करकमली विसावे ।
हितगुज मनीचे त्यांना सांगावे ।
देहभान हे हरपावे ।
अस्तित्व विसरूनी । त्यांच्यातच विलीन व्हावे ।।

– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक. (१५.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक