ब्रॅडफोर्ड (इंग्‍लंड) येथे अल्‍पवयीन मुलीच्‍या सामूहिक बलात्‍काराच्‍या प्रकरणी उमर ताज याला अटक !

अटक केलेल्‍या मुसलमानांची संख्‍या झाली २४ !

लंडन (इंग्‍लंड) – एका अल्‍पवयीन मुलीवर सामूहिक बलात्‍कार केल्‍याच्‍या प्रकरणी इंग्‍लंडच्‍या वेस्‍ट यॉर्कशायर पोलिसांनी ब्रॅडफोर्ड शहरातून उमर ताज नावाच्‍या मुसलमानाला अटक केली. या अटकेमुळे या प्रकरणी अटक करण्‍यात आलेल्‍यांची संख्‍या आता २४ झाली आहे. या आरोपींवर १३ वर्षांच्‍या अल्‍पवयीन मुलीवर सामूहिक बलात्‍कार करून तिला वेश्‍याव्‍यवसायामध्‍ये ढकलल्‍याचा आरोप आहे.

वेस्‍ट यॉर्कशायर पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकानुसार, पीडित मुलीवर वर्ष  २००७ ते २०११ या कालावधीत अनेकदा बलात्‍कार करण्‍यात आले होते. या प्रकरणी आतापर्यंत खजर हुसेन, सैयद शब्‍बीर, अब्‍बास हुसेन, सैयद हसन बशारत, इब्राहिम अली, जमील अहमद, महंमद नदीम अली, उमर ताज आदींना अटक करण्‍यात आली आहे.

इंग्‍लंडमध्‍ये मोठ्या प्रमाणात ‘ग्रूमिंग जिहाद’ !

‘ग्रूमिंग जिहाद’ ही जागतिक समस्‍या असून या षड्‍यंत्राच्‍या अंतर्गत मुसलमान युवक अल्‍पवयीन मुली आणि महिला यांच्‍यावर अत्‍याचार करत आहेत. त्‍यांचे शारीरिक शोषण करण्‍यात येत आहे. एका अहवालानुसार वर्ष २०२० मध्‍ये युनायटेड किंगडमच्‍या पोलिसांनी ‘वेस्‍ट यॉर्कशायर’मधील ८ अल्‍पवयीन मुलींवर केलेल्‍या लैंगिक शोषणाच्‍या संदर्भात ३२ पुरुषांना अटक करून त्‍यांच्‍यावर १५० हून अधिक गुन्‍हे नोंद केले होते. या सर्वांवर बलात्‍कार, अभद्रता, तस्‍करी, मुलींचे अश्‍लील व्‍हिडिओ बनवणे आदी गंभीर लैंगिक गुन्‍हे प्रविष्‍ट करण्‍यात आले होते.

‘डेली मेल’च्‍या एका अहवालानुसार वर्ष २०१८-१९ मध्‍ये मुसलमान युवकांकडून तब्‍बल १८ सहस्र ७०० मुलींचे लैंगिक शोषण करण्‍यात आले होते.

 

संपादकीय भूमिका

असे वासनांध मुसलमान ही जागतिक डोकेदुखीच म्‍हणावी लागेल !