‘आपल्या भारत देशात जातीभेदाच्या विरुद्ध पुष्कळ अपप्रचार करण्यात आला आहे; परंतु हा अपप्रचार जेवढा वाढत गेला, तेवढीच जातीभेदाची शृंखलाही दृढ होत गेली. जातीभेदाची उत्पत्ती आणि प्रचार हा अधिकतर राजकीय पक्ष अन् सरकार यांनी भारतियांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी केला.
प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वर्णाप्रमाणे करत असलेल्या कृती
प्रत्येक व्यक्तीमध्ये ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र या वर्णांचा अंश असतो. (आपले वैशिष्ट्य प्रदर्शित करण्याचे स्वातंत्र्य सर्वांनाच असते.) आपण मनुष्याची दैनंदिन जीवनपद्धत पाहूया.
१. जेव्हा तो अर्थ प्राप्तीसाठी एखादी सेवा (उदा. स्वच्छतेची सेवा इत्यादी) करत असेल, तर तो ‘शूद्र’ वर्णाचा होतो.
२. जेव्हा मनुष्य स्वतःच्या लाभासाठी काही विकत घेणे, विक्री करणे आदी कृती करत असेल, तर त्याला ‘वैश्य’ वर्णाची संज्ञा दिली जाते.
३. मनुष्य जेव्हा अन्यायाच्या विरुद्ध शस्त्र उचलतो आणि शास्त्र (कायदे) वापरतो, तेव्हा त्याला ‘क्षत्रियाची’ संज्ञा दिली जाते.
४. जेव्हा मनुष्य स्वतःच्या मोक्षप्राप्तीसाठी ईश्वर चिंतन करू लागतो अथवा भगवंताचे कीर्तन करतो, तेव्हा त्याला ‘ब्राह्मण’ ही संज्ञा दिली जाते.
५. हे स्पष्ट आहे की, मनुष्याचा वरील ४ वर्णांमध्ये समावेश असतो, मग लोकांमध्ये भेदभाव का करावा ?
(साभार : मासिक ‘अक्षर प्रभात’, जानेवारी २०२०)