पाकिस्तानमध्ये हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार आणि मारहाण

रुग्णालयातील डॉक्टरांकडून महिलेवर उपचार करण्यास नकार !

बहावलपूर (पाकिस्तान) – पाकच्या पंजाब राज्यातील बहावलपूर येथे मजुरी करणारे गंगाराम यांची पत्नी येथील मुसलमान जमीनदार महंमद अक्रम याच्याकडे काम मागण्यासाठी गेली होती. त्याने तिला धमकावून परत पाठवून दिले. नंतर अक्रम शस्त्र घेऊन तिच्या घरी गेला आणि तिचे अपहरण केले. तिच्यावर ६ जणांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला मारहाणही केली. या प्रकरणी तक्रार करण्यात आल्यावर पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.

या महिलेला पोलिसांकडून रुग्णालयात नेण्यात आल्यावर तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास आणि वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. या घटनेविषयी स्थानिक हिंदूंनी रस्त्यावर उतरून आंदोलन चालू केले आहे. आरोपी आणि डॉक्टर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

पाकमध्ये हिंदूंवर अत्याचार होणे, त्यांचा वंशसंहार होणे आता नवीन राहिलेले नाही. काही वर्षांत तेथे हिंदू औषधालाही शिल्लक रहाणार नाहीत, हेही तितकेच सत्य आहे. याविषयी जगभरातील हिंदूंना काहीही देणेघेणे नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !