शिक्षा पूर्ण होऊनही झाली नव्हती सुटका !
नवी देहली – पाकिस्तानच्या कारागृहात अटकेत असलेल्या ६ भारतीय बंदीवानांचा गेल्या ९ मासांत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांची शिक्षा पूर्ण होऊनही पाकने त्यांना कारागृहात डांबून ठेवले होते. मृत्युमुखी पडलेल्या ६ बंदीवानांपैकी ५ जण मच्छिमार होते.
विदेश मंत्रालय ने पाकिस्तान के इस रवैये पर नाराजगी व्यक्त की है #India #Pakistan https://t.co/oVzH0MhNBr
— AajTak (@aajtak) October 7, 2022
१. या घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, पाकिस्तानातील भारतीय बंदीवानांना भारतात परत पाठवण्याचे आवाहन करूनही पाकने अवैधरित्या कह्यात ठेवले आहे. या बंदीवानांच्या मृत्यूच्या घटना वाढत असून ही चिंतेची गोष्ट आहे. इस्लामाबादमधील आमच्या उच्चायुक्ताने भारतीय बंदीवानांच्या सुरक्षेचे सूत्र वारंवार उपस्थित केले आहे. सर्व भारतीय बंदीवानांची तात्काळ सुटका करून त्यांना मायदेशात परत पाठवावे, असे पाकिस्तान सरकारला आवाहन केले आहे.
२. पाकिस्तानच्या कारागृहात ३०० हून अधिक भारतीय बंदीवान आहेत; मात्र पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे केवळ २६० बंदीवान आहेत. यापैकी अनेक कैद्यांची शिक्षाही पूर्ण झाली आहे, तरीही पाकिस्तान त्यांची सुटका करत नाही.
संपादकीय भूमिकावर्ष १९७१ च्या युद्धाच्या वेळी पकडलेल्या ५४ भारतीय सैनिकांनाही पाकने सोडलेले नाही. ‘असे सैनिक आमच्याकडे नाहीत’, असे पाकने सांगितले. दुसरीकडे त्या वेळी भारताने शरण आलेल्या पाकच्या ९० सहस्र सैनिकांना सोडले होते. ही स्थिती आज ५१ वर्षांनंतरही तशीच आहे, हे भारताला लज्जास्पद ! |