‘लव्ह जिहाद’चे वृत्त देणार्‍या महिला पत्रकाराला धर्मांधांकडून धमकी !

मुंबई येथे धर्मांधाने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याचे प्रकरण  

मुंबई – येथील वातावरण आधीच खराब आहे. हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण नाही. आमच्या भागात यायचे नाही. आमच्या समाजाला त्रास झाला, तर आम्ही तुला सोडणार नाही, अशी धमकी ‘लव्ह जिहाद’चे वृत्त देणार्‍या दैनिक ‘तरुण भारत’च्या पत्रकार योगिता साळवी यांना धर्मांधांनी दिली. मागील आठवड्यामध्ये चेंबूर येथे इक्बाल शेख याने त्याची पत्नी रूपाली चंदनशिवे हिची भर रस्त्यात गळा चिरून हत्या केली. याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी मृत रूपाली हिच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलेल्या पत्रकार योगिता साळवी यांना अडवून धर्मांधांनी धमकी दिली. या प्रकरणी योगिता साळवी यांनी चेंबूर येथील टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

इक्बाल शेख याने पत्नीने इस्लामप्रमाणे आचरण करावे, यासाठी तिला मारहाण केली होती. ती बुरखा घालत नसल्याच्या रागातून इक्बाल याने २६ सप्टेंबरच्या रात्री भर रस्त्यात गळा चिरून तिची हत्या केली. १ ऑक्टोबर या दिवशी चेंबूर येथे रूपाली हिच्या कुटुंबियांची भेट घेऊन परतत असलेल्या योगिता आणि साळवी आणि त्यांच्या २ मैत्रिणी यांना धर्मांध पुरुष आणि महिला यांनी थांबवून धमकी दिली. धर्मांध महिलेने आरडाओरड करून अन्य धर्मांधांना गोळा करून योगिता साळवी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंनो, धर्मांधांच्या ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राविषयी वेळीच जागृत व्हा !
  • हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न नेहमी धर्मांधांकडूनच होत असतो, हेच या घटनेवरून अधोरेखित होते !