भारतात पाकिस्तान सरकारच्या टि्वटर खात्यावर बंदी

‘पी.एफ्.आय.’वरील बंदीच्या विरोधात केले होते ट्वीट !

नवी देहली – भारत सरकारने पाकिस्तान सरकारच्या टि्वटर खात्यावर भारतात बंदी आणली आहे. भारताने नुकतीच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर ५ वर्षांसाठी बंदी घातल्यावर या खात्यावरून त्यावर टीका करणारे ट्वीट करण्यात आले होते. यामुळेच ही बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

कॅनडामधील पाकिस्तानच्या दूतावासाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या समर्थनार्थ केलेले ट्वीट सामाजिक माध्यमांतून सर्वत्र प्रसारित झाले होते. या ट्वीटमध्ये म्हटले होते, ‘पी.एफ्.आय.’ला लक्ष्य करत भारत सरकारने लोकशाही मूल्यांचे उल्लंघन केले आहे. या निरंकुश व्यवस्थेच्या अंतर्गत अशीच कारवाई होणार होती.’ यानंतर सामाजिक माध्यमांतून पाकच्या ट्वीटवर टीका करण्यात आली होती.