रांची (झारखंड) येथील मंदिरातील श्री हनुमानाची मूर्तीची मुसलमानाकडून तोडफोड

पोलिसांनी (नेहमीप्रमाणे) मुसलमानाला मनोरुग्ण ठरवले !

श्री हनुमंताच्या मूर्तीची करण्यात आलेली तोडफोड

रांची (झारखंड) – येथील हनुमान मंदिरामध्ये २७ सप्टेंबरच्या रात्री मंदिराचे टाळे तोडून श्री हनुमंताच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. सकाळी स्वच्छतेसाठी विक्की विश्‍वकर्मा नावाची व्यक्ती आली असता ही घटना उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे रमीझ अहमद याला अटक केली; मात्र तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. तथापि स्थानिक हिंदूंकडून पोलिसांच्या या भूमिकेवर  प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत. या घटनेमुळे येथे तणावाची स्थिती आहे.

दोनच दिवसांपूर्वी भाग्यनगर येथे बुरखा घातलेल्या दोघा मुसलमान महिलांनी नवरोत्रोत्सवातील मंडपात घुसून तेथील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केली होती. त्याही प्रकरणात पोलिसांनी त्यांना त्या मनोरुग्ण असल्याचे सांगितले होते.

संपादकीय भूमिका

  • मुसलमान मनोरुग्णांना केवळ हिंदूंच्याच देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्याची बुद्धी कशी होते ? हे भारतातील अतीशहाणे पोलीस सांगतील का ?
  • हिंदूंच्या धार्मिक स्थळांची तोडफोड मुसलमानांकडून करण्यात आल्यावर हिंदूंची दिशाभूल करून तथाकथित कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून जाणीवपूर्वक अशा प्रकारची खोटी माहिती दिली जाते. अशा पोलिसांच्या विरोधात आता हिंदूंनी वैध मार्गाने आवाज उठवणे आवश्यक आहे !