वसीमने ‘अर्जुन’ बनून हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात

उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण उजेडात

सीतापूर ((उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील सीतापूर जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना समोर आली आहे. तेथे वसीम नावाच्या मुसलमान तरुणाने ‘अर्जुन’ असे हिंदु नाव धारण करून एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. एका मंदिरात तिच्याशी विवाह केला. विवाहाच्या वर्षभरानंतर वसीमचे सत्य समोर आल्यानंतर पीडित पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर वसीमला अटक करण्यात आली.

पीडितेच्या तक्रारीनुसार, जेव्हा तिची वसीमशी ओळख झाली, तेव्हा वसीमने स्वत:चे नाव अर्जुन असल्याचे सांगितले होते. दोघांनी मंदिरात हिंदु पद्धतीनुसार विवाह केला होता. बाळाच्या जन्मानंतर परिस्थिती पालटली. वर्षभरानंतर तो अर्जुन नसून वसीम असल्याचे सत्य समोर आले. मुलाच्या जन्मानंतर वसीमने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणणे चालू केले. तिने नकार दिल्याने त्याने मारहाण करणे चालू केले.