बलात्काराच्या प्रकरणी गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या नेत्याला अटक  

आम आदमी पक्षाचे नेते भागू वाला (डावीकडे)

सोमनाथ (गुजरात) – बलात्काराच्या प्रकरणी पोलिसांनी आम आदमी पक्षाचे नेते भागू वाला यांना वेरावळ येथून अटक केली.

१. वेरावळचे पोलीस निरीक्षक सुनील इसरानी यांनी सांगितले की, २३ वर्षीय तरुणीने २३ सप्टेंबर या दिवशी भागू वाला यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार प्रविष्ट केली होती. तक्रारीनंतर या तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.

२. भागू वाला हे पूर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. नुकतेच त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यांचे स्वतःचे चित्रपट निर्मिती करणारे आस्थापन आहे. त्यांनी पीडित तरुणीला काम देण्याचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

संपादकीय भूमिका

‘राजकीय पक्षात नीतीमत्ता असणारे नेते आहेत’, असे म्हणणे आता धाडसाचे ठरत आहे ! ‘ही लोकशाहीची शोकांतिका आहे’, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !